तुळजापूरच्या पवित्र भूमीत श्री तुळजाभवानी देवीच्या पारंपरिक पूजा-विधी आणि धार्मिक सेवेसाठी आपले मनःपूर्वक स्वागत. श्री तुळजाभवानी देवीचे पुजारी म्हणून आम्ही भक्तांना अभिषेक पूजा, सिंहासन पूजा आणि इतर धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने करण्यासाठी मार्गदर्शन व सेवा प्रदान करतो.
श्री तुळजाभवानी देवीच्या धार्मिक परंपरा आणि विधींनुसार भक्तिभावाने पूजा सेवा.
तुळजापूर येथे येण्यापूर्वी उपलब्ध पूजांसाठी सोयीस्कर ऑनलाइन बुकिंग व मार्गदर्शन.
मातेच्या दर्शनासाठी आवश्यक माहिती आणि नियोजनाबाबत भाविकांना मार्गदर्शन.
भाविकांच्या श्रद्धेनुसार नैवेद्याशी संबंधित आवश्यक व्यवस्था व मार्गदर्शन.
श्री संग्राम श्रीकांत झाडपिडे ( कदम ) शिक्षण :- BE ( E & T C )
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीचे क्षेत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ मानले जाते. भवानी, भगवती आणि तुळजाभवानी माता म्हणून श्रद्धेने पूजली जाणारी ही देवी महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतील एक अत्यंत महत्त्वाचे दैवत आहे. महाराष्ट्राच्या क्षात्रतेजाची स्फूर्ती, प्रेरणाशक्ती आणि स्वराज्य संस्थापक राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य दैवता म्हणून श्री तुळजाभवानी देवीला विशेष स्थान प्राप्त आहे. त्यामुळेच ती महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून भक्तिभावाने वंदिली जाते
श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आणि पूजाविधीसाठी देशभरातून येणाऱ्या भक्तांच्या श्रद्धेचे हे पवित्र तुळजापूर क्षेत्र आहे
Bhogi Puja
भोगी पूजा
Rs. 501
Bhogi Puja
भोगी पूजा
Rs. 501
Naivaidya Puja
नैवेद्य पूजा
Rs. 251
Naivaidya Puja
नैवेद्य पूजा
Rs. 251
Abhishek Puja
पंचामृत अभिषेक पूजा
Rs. 1100
Abhishek Puja
पंचामृत अभिषेक पूजा
Rs. 1100
Sadicholi Puja (6 Var)
साडीचोळी पूजा ६ वार
Rs. 751
Sadicholi Puja (6 Var)
साडीचोळी पूजा ६ वार
Rs. 751
श्री तुळजाभवानी मातेचा छबिना हा तुळजापूरच्या धार्मिक परंपरेतील एक महत्त्वाचा उत्सवविधी आहे. वर्षभरात ठराविक दिवशी मातेचा छबिना भक्तिभावाने काढला जातो. साधारणपणे प्रत्येक मंगळवारी, पौर्णिमेच्या आदल्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी आणि पौर्णिमेनंतरच्या दिवशी छबिना काढण्याची परंपरा आहे. फाल्गुन पौर्णिमेचा छबिना गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो. तसेच वर्षातील २१ निद्राकाळांमध्ये येणाऱ्या मंगळवारी देवी शयनगृहामध्ये निद्रिस्त असल्यामुळे त्या दिवशी छबिना काढला जात नाही. याव्यतिरिक्त वर्षभर वरील परंपरेनुसार छबिना काढण्यात येतो.
(गुढीपाडवा)
गुढीपाडव्याचा दिवस श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील धार्मिक परंपरेत विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी चरणतीर्थाच्या वेळी भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेला साखरेचा हार श्री तुळजाभवानी मातेच्या गळ्यात घालण्यात येतो. चरणतीर्थ विधी पूर्ण झाल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी मंदिराच्या मुख्य शिखरासमोर असलेल्या छतावर मंदिर संस्थेच्या वतीने गुढी उभारण्यात येते. गुढीपाडव्याच्या या मंगलदिनी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते. या विशेष प्रसंगी श्री तुळजाभवानी मातेचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात येतो आणि मातेची विधिवत पूजा-अर्चना केली जाते. भक्तिभाव, परंपरा आणि मंगलमय वातावरणात साजरा होणारा हा गुढीपाडव्याचा सोहळा तुळजापूरच्या धार्मिक परंपरेचे सुंदर दर्शन घडवतो. श्री तुळजाभवानी मातेची कृपा आपल्या आणि आपल्या परिवारावर सदैव राहो. जय आई तुळजाभवानी!🙏