Skip to main content

!! श्री तुळजाभवानी प्रसन्न !!

श्री तुळजाभवानी मंदिर पूजा विधी

तुळजापूरच्या पवित्र भूमीत श्री तुळजाभवानी देवीच्या पारंपरिक पूजा-विधी आणि धार्मिक सेवेसाठी आपले मनःपूर्वक स्वागत. श्री तुळजाभवानी देवीचे पुजारी म्हणून आम्ही भक्तांना अभिषेक पूजा, सिंहासन पूजा आणि इतर धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने करण्यासाठी मार्गदर्शन व सेवा प्रदान करतो.

ऑनलाइन पूजा संदर्भभात

महत्वाची सूचना

 श्री तुळजाभवानी देवीची अभिषेक पूजा आणि सिंहासन पूजा ही बुकिंग पद्धतीने करण्यात येत असून ज्या भाविकांना अभिषेक पूजा किंवा सिंहासन पूजा करायची असेल अशा भाविकांनी पूजा बुकिंग करण्यापूर्वी  संपर्क करावा. अभिषेक पूजा बुकिंग ही ऑनलाईन पद्धतीने असल्या कारणामुळे ज्या भाविकांना अभिषेक पूजा करायची असेल अशा भाविकांनी आपले आधार कार्ड फोटो पाठवणे गरजेचे आहे. ही नोंद घ्यावी.

बुकिंग पद्धतीने पूजा

विशेष पूजा पूर्व बुकिंगद्वारे केली जाते.

आधार कार्ड आवश्यक

अभिषेक पूजा बुकिंगसाठी आधार कार्डचा फोटो आवश्यक आहे.

संपर्क करून बुकिंग करा

पूजा बुकिंग करण्यापूर्वी आमच्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

विश्वासार्ह व सुरक्षित सेवा

भाविकांची श्रद्धा आणि सोयीला प्राधान्य देऊन पूजा सेवा दिली जाते.

भोगी पूजा

श्री तुळजाभवानी देवीची  एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू याने  ओटी भरून कापूर आरती केली जाते. 

नैवेद्य पूजा

श्री तुळजाभवानी देवीला  पुरणपोळी,भात-वरण ,दोन भाज्या ,पापड ,भजे,चटणी या प्रकारचा नैवद्य  दाखवला जातो.

पंचामृत अभिषेक पूजा

पंचामृत अभिषेक पुजा हि श्री तुळजाभवानी मातेला कुलधर्म कुलाचार या पूजा विधी मधील अभिषेक पुजा हि महत्वाची अशी पूजा आहे.या पुजेमध्ये श्री तुळजाभवानी देवीच्या मुख्य मूर्तीच्या चरणाला केळी, मध, लिंबू, साखर लावून देवीजींच्या चरणावरती दह्याची आंघोळ घातली जाते. आणि श्री  तुळजाभवानी देवीची एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू याने देवीची ओटी भरून कापूर आरती केली जाते.

पंचामृत अभिषेक पूजा (६ वार)

पंचामृत अभिषेक साडीचोळी(६वार) हि पुजा श्री तुळजाभवानी मातेला कुलधर्म कुलाचार या पूजा विधी मधील अभिषेक पुजा हि महत्वाची अशी पूजा आहे. या पुजेमध्ये श्री तुळजाभवानी  देवीच्या मुख्य मूर्तीच्या चरणाला केळी, मध, लिंबू, साखर लावून देवीजींच्या चरणावरती दह्याची आंघोळ घातली जाते.आणि श्री तुळजाभवानी देवीची साडीचोळी (६वार), एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू याने देवीची ओटी भरून कापूर आरती केली जाते.

पंचामृत अभिषेक पूजा (९ वार)

पंचामृत अभिषेक साडीचोळी(९वार)पुजा हि श्री तुळजाभवानी मातेला कुलधर्म कुलाचार या पूजा विधी मधील अभिषेक पुजा हि महत्वाची अशी पूजा आहे.या पुजेमध्ये श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीच्या चरणाला केळी, मध, लिंबू, साखर लावून देवीजींच्या चरणावरती दह्याची आंघोळ घातली जाते.आणि श्री तुळजाभवानी देवीची साडीचोळी(९वार), एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू याने देवीची ओटी भरून कापूर आरती केली जाते.

साडीचोळी पूजा (६ वार)

या पुजेमध्ये श्री तुळजाभवानी देवीला सहा वार साडीचोळी अर्पण करून देवीची  एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू याने  ओटी भरून कापूर आरती केली जाते.

साडीचोळी  पूजा ९ वार

या पुजेमध्ये श्री तुळजाभवानी देवीला नऊ वार साडीचोळी अर्पण करून देवीची  एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू याने  ओटी

सिंहासन श्रीखंड महापूजा

या पुजेमध्ये  श्री तुळजाभवानी देवीच्या चरणाला स्पर्श होईपर्यंत सिंहासन श्रीखंडानेे भरले जाते.आणि श्री देवाजींची महावस्त्र, सौभाग्य अलंकार,एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी कुंकू याने ओटी भरून कापूर आरती केली जाते.

अलंकार महापूजा

अलंकार महापूजा या मध्ये श्री तुळजाभवानी  देवीजींच्या चरणावरती अभिषेक केला जातो. आणि देवीजींची महावस्त्र,सौभाग्य अलंकार, एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू याने देवीची ओटी भरून कापूर आरती केली जाते

पानाचे घर

श्री तुळजाभवानी देवीची  सायंकाळची धूप आरती नंतर  देवीजींच्या सिंहासनला पानाचे घर बांधून पूजा केली जाते. 

जागरण गोंधळ पूजा

श्री तुळजाभवानी देवीच्या जागरण गोंधळ पुजेमध्ये मंदिरामध्ये चौकमांडला जातो आणि त्या पूजेसाठी एक नारळ,पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू,गुलाल,बुक्का,अष्टगंध,इतर साहित्य पुजेस वापरून गोंधळ पुजा करण्यात येते. देवीची ओटी भरून कापूर आरती केली जाते.

माळ, परडी पूजा

श्री तुळजाभवानी देवीची आराधना करण्यासाठी हि देवी ज्यांची कुलदैवता आहे असे भाविक या ठिकाणी येऊन कवड्यांची माळ व परडी श्री देविजींच्या चरणास लाऊन घेतात व मंदिरात पोत पाजळून नैवद्य दाखवून पूजा करतात.