तुळजापूरच्या पवित्र भूमीत श्री तुळजाभवानी देवीच्या पारंपरिक पूजा-विधी आणि धार्मिक सेवेसाठी आपले मनःपूर्वक स्वागत. श्री तुळजाभवानी देवीचे पुजारी म्हणून आम्ही भक्तांना अभिषेक पूजा, सिंहासन पूजा आणि इतर धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने करण्यासाठी मार्गदर्शन व सेवा प्रदान करतो.
श्री तुळजाभवानी देवीची अभिषेक पूजा आणि सिंहासन पूजा ही बुकिंग पद्धतीने करण्यात येत असून ज्या भाविकांना अभिषेक पूजा किंवा सिंहासन पूजा करायची असेल अशा भाविकांनी पूजा बुकिंग करण्यापूर्वी संपर्क करावा. अभिषेक पूजा बुकिंग ही ऑनलाईन पद्धतीने असल्या कारणामुळे ज्या भाविकांना अभिषेक पूजा करायची असेल अशा भाविकांनी आपले आधार कार्ड फोटो पाठवणे गरजेचे आहे. ही नोंद घ्यावी.
विशेष पूजा पूर्व बुकिंगद्वारे केली जाते.
अभिषेक पूजा बुकिंगसाठी आधार कार्डचा फोटो आवश्यक आहे.
पूजा बुकिंग करण्यापूर्वी आमच्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
भाविकांची श्रद्धा आणि सोयीला प्राधान्य देऊन पूजा सेवा दिली जाते.
श्री तुळजाभवानी देवीची एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू याने ओटी भरून कापूर आरती केली जाते.
Bhogi Puja
भोगी पूजा
Rs. 501
श्री तुळजाभवानी देवीला पुरणपोळी,भात-वरण ,दोन भाज्या ,पापड ,भजे,चटणी या प्रकारचा नैवद्य दाखवला जातो.
Naivaidya Puja
नैवेद्य पूजा
Rs. 251
पंचामृत अभिषेक पुजा हि श्री तुळजाभवानी मातेला कुलधर्म कुलाचार या पूजा विधी मधील अभिषेक पुजा हि महत्वाची अशी पूजा आहे.या पुजेमध्ये श्री तुळजाभवानी देवीच्या मुख्य मूर्तीच्या चरणाला केळी, मध, लिंबू, साखर लावून देवीजींच्या चरणावरती दह्याची आंघोळ घातली जाते. आणि श्री तुळजाभवानी देवीची एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू याने देवीची ओटी भरून कापूर आरती केली जाते.
Abhishek Puja
पंचामृत अभिषेक पूजा
Rs. 1100
पंचामृत अभिषेक साडीचोळी(६वार) हि पुजा श्री तुळजाभवानी मातेला कुलधर्म कुलाचार या पूजा विधी मधील अभिषेक पुजा हि महत्वाची अशी पूजा आहे. या पुजेमध्ये श्री तुळजाभवानी देवीच्या मुख्य मूर्तीच्या चरणाला केळी, मध, लिंबू, साखर लावून देवीजींच्या चरणावरती दह्याची आंघोळ घातली जाते.आणि श्री तुळजाभवानी देवीची साडीचोळी (६वार), एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू याने देवीची ओटी भरून कापूर आरती केली जाते.
Abhishek Puja (6 var)
पंचामृत अभिषेक पूजा (६ वार)
Rs. 1551
पंचामृत अभिषेक साडीचोळी(९वार)पुजा हि श्री तुळजाभवानी मातेला कुलधर्म कुलाचार या पूजा विधी मधील अभिषेक पुजा हि महत्वाची अशी पूजा आहे.या पुजेमध्ये श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीच्या चरणाला केळी, मध, लिंबू, साखर लावून देवीजींच्या चरणावरती दह्याची आंघोळ घातली जाते.आणि श्री तुळजाभवानी देवीची साडीचोळी(९वार), एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू याने देवीची ओटी भरून कापूर आरती केली जाते.
Abhishek Puja 9 var)
पंचामृत अभिषेक पूजा (९ वार)
Rs. 2100
या पुजेमध्ये श्री तुळजाभवानी देवीला सहा वार साडीचोळी अर्पण करून देवीची एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू याने ओटी भरून कापूर आरती केली जाते.
Sadicholi Puja (6 Var)
साडीचोळी पूजा ६ वार
Rs. 751
या पुजेमध्ये श्री तुळजाभवानी देवीला नऊ वार साडीचोळी अर्पण करून देवीची एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू याने ओटी
Sadicholi Puja (9 var)
साडीचोळी पूजा (९ वार)
Rs. 1100
या पुजेमध्ये श्री तुळजाभवानी देवीच्या चरणाला स्पर्श होईपर्यंत सिंहासन श्रीखंडानेे भरले जाते.आणि श्री देवाजींची महावस्त्र, सौभाग्य अलंकार,एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी कुंकू याने ओटी भरून कापूर आरती केली जाते.
Sinhasan Shrikhand Mahapuja
सिंहासन श्रीखंड महापूजा
Rs. 21000
अलंकार महापूजा या मध्ये श्री तुळजाभवानी देवीजींच्या चरणावरती अभिषेक केला जातो. आणि देवीजींची महावस्त्र,सौभाग्य अलंकार, एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू याने देवीची ओटी भरून कापूर आरती केली जाते
Alankar Mahapuja
अलंकार महापूजा
Rs. 3100
श्री तुळजाभवानी देवीची सायंकाळची धूप आरती नंतर देवीजींच्या सिंहासनला पानाचे घर बांधून पूजा केली जाते.
Panache Ghar
पानाचे घर
Rs. 1551
श्री तुळजाभवानी देवीच्या जागरण गोंधळ पुजेमध्ये मंदिरामध्ये चौकमांडला जातो आणि त्या पूजेसाठी एक नारळ,पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू,गुलाल,बुक्का,अष्टगंध,इतर साहित्य पुजेस वापरून गोंधळ पुजा करण्यात येते. देवीची ओटी भरून कापूर आरती केली जाते.
Jagaran Gondhal Puja
जागरण गोंधळ पूजा
Rs. 1100
श्री तुळजाभवानी देवीची आराधना करण्यासाठी हि देवी ज्यांची कुलदैवता आहे असे भाविक या ठिकाणी येऊन कवड्यांची माळ व परडी श्री देविजींच्या चरणास लाऊन घेतात व मंदिरात पोत पाजळून नैवद्य दाखवून पूजा करतात.
Abhishek Puja
पंचामृत अभिषेक पूजा
Rs. 1100